मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: शुक्रवार, 29 जून 2018 (09:14 IST)

स्विस बॅंकेकडे वळवला भारतीयांनी पैसा ५० टक्क्यांनी वाढ

भारतीय नागरिकांनी स्विस बॅंकेकडे आपला मोर्चा वळवला आहे. भारतीयांनी मागील वर्षाच्या तुलनेत स्विस बॅंकेकडे ५० टक्क्यांनी वाढवला आहे. एक अरब स्विस फॅंक (७,००० कोटी रुपये) जमा करण्यात आले आहेत. जर गतवर्षीची तुलना केली तर ५० टक्क्यांनी वाढ झालेली पाहायला मिळत आहे. स्विझर्लंडची केंद्रीय बॅंकेच्या ताज्या अहवालामध्ये हे आकडे पुढे आलेत. म्हणजेच भारतीयांनी स्विस बॅंक खात्यात जमा केलेला पैसा २०१७मध्ये ५० टक्क्यांनी वाढून ७००० कोटी रुपये (१.०१ अरब फ्रॅंक) झाले आहेत. त्यामुळे काळा पैसा मोदी सरकार भारतात आणणार हे सर्व फार्स ठरले आहे. उलट नोटाबंदी नंतर सर्वाधीक पैसा जमा स्विस बॅंकेकडे झाला आहे. स्विस बॅंक खात्यात भारतीयांनी २०१६मध्ये ४५ टक्के घट होऊन ६७,६ कोटी फ्रॅंक (जवळपास ४५०० कोटी रुपये) राहिले आहेत. ज्या आकडेवारीनुसार, भारतीयांच्या स्विस बँक खात्यात जमा केलेल्या ३२०० कोटीं रुपये. अन्य बॅंकेच्या माध्यातून १०५० कोटी रुपये आहेत. त्यामुळे भारतीय काही आपला पैसा देशात ठेवत नसून पूर्ण पैसा बाहेर वळवत असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.