गुरूवार, 18 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. आरोग्य सल्ला
Written By
Last Modified: शुक्रवार, 23 ऑक्टोबर 2020 (13:25 IST)

Cycling करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा अन्यथा आरोग्यास हानी होऊ शकते

सध्याच्या कोरोनाच्या काळात स्वतःला तंदुरुस्त ठेवण्यासाठी बहुतेक लोक सायकल चालविणे पसंत करत आहे आणि तंदुरुस्तीसाठी सायकल चालवणे आपल्या दिनचर्ये मध्ये समाविष्ट करत आहे. फिट आणि सक्रिय राहण्यासाठी सायकल चालवणे हे सर्वोत्तम व्यायाम मानले जाते. आपण नियमितपणे सायकल चालवली तर यामुळे शरीराचा संपूर्ण व्यायाम होतो आणि आपण टोन्ड आणि चांगले फिगर असलेले शरीर मिळवू शकता. तरी सायकल चालवताना आपल्याला काही गोष्टींना लक्षात ठेवणं फार महत्वाचं असतं. नाही तर आरोग्याच्या काही तक्रारी उद्भवू शकतात. 
 
काही लोकांना सवय असते, की ते थोड्या थोड्या वेळाने पाणी पितात, ही सवय फार चांगली आहे पण सायकल चालवताना जास्त प्रमाणात पाणी पियू नये. असे केल्यास आपल्याला मळमळू शकतं. तसेच जास्त पाणी प्यायल्यामुळे वारंवार लघवीचा त्रास देखील होऊ शकतो. त्यामुळे ओटीपोटात वेदना देखील होऊ शकतात. म्हणून सायकल चालवताना पाणी पिऊ नका.
 
सायकल चालवणे हे फिट राहण्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. म्हणून सायकल चालवताना फास्ट फूड किंवा जंक फूड पासून लांबच राहावं, कारण अनारोग्य असे खाल्ल्यानं शरीरातील चरबी वाढते. त्या मुळे आपल्याला आळशीपणा जाणवेल.
 
सायकल चालवण्यापूर्वी स्ट्रेचिंग करू नका. तसे तर वर्कआउट करण्यापूर्वी स्ट्रेचिंग करण्याचा सल्ला दिला जातो. पण सायकल चालवण्यापूर्वी स्ट्रेचिंग करू नये. 
 
यामुळे स्नायू कमकुवत होतात आणि त्यांमध्ये ताण येऊ शकतं. जर आपल्याला स्ट्रेचिंग करावयाचे असल्यास किमान अर्ध्या तासाच्या पूर्वी करावं.
 
बऱ्याच वेळा असे घडतं की सायकल चालविण्याचा आनंदाला दुप्पट करण्यासाठी काही लोकं स्टंट करतात. असे करू नये असे केल्यास अपघात होण्याची शक्यता असते.