चल रे भोपळ्या टुणुक टुणुक

child poem
Kids Poem
Last Modified मंगळवार, 17 नोव्हेंबर 2020 (11:10 IST)
ही गोष्ट आहे एका म्हातारीचीची, एका गावात एक म्हातारी राहत होती. तिला एकच मुलगी होती त्या मुलीचे लग्न झाले होते आणि ती दुसऱ्या गावात दिली होती. ती म्हातारी फार अशक्त होती तिला काही दिवस आरामासाठी आपल्या लेकीकडे जायचे होते. आपल्या लेकीशी भेट घेण्यासाठी तिला जंगलातून जायचे होते. ती हळू-हळू काठी टेकत टेकत आपल्या लेकीला भेटायला निघाली.

वाटेत जंगलात शिरतातच तिला एक अस्वल भेटले. त्या अस्वलाने तिच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला तर तिने त्या अस्वलाला थांबवले आणि म्हणाली की थांब... बघ माझ्याकडे मी तर आत्ता फार अशक्त आहे आणि आत्ता आपल्या लेकीकडे जात आहे. काही दिवस तिथेच राहीन, भरपूर खाईन, धडधाकट होईन मग परत येताना तू मला खा, जेणे करून तुझे पोट तरी भरेल. अस्वलाला तिचे म्हणणे पटले तिने त्या म्हातारीला सोडले.
काठी टेकत टेकत ती म्हातारी पुढे निघाली तेवढ्यात बघते तर काय ! अरे देवा तिचा समोर एक सिंह उभा आणि तो म्हातारीला खाणार तेवढ्यात ती म्हातारी त्याला म्हणे की अरे -मला बघ मी किती अशक्त आहे. मी आपल्या लेकी कडे जात आहे तिथे भरपूर खाईन लठ्ठ होईन मग तू मला खा म्हणजे तुझे पोट तरी भरेल. सिंहाला तिचे म्हणणे पटले आणि त्याने म्हातारीला जाऊ दिले.

ती आपल्या लेकीच्या घरी सुखरूप पोहोचली. तिच्या लेकीने तिच्या साठी चांगले-चांगले पक्वान्न तयार करून ठेवले होते. तिला खूप भूक लागली होती. तिने जेवण केले आणि काही महिने तिथेच राहिली. नंतर तिला तिच्या घराला यायचे होते पण येणार कसे वाटेत तर सिंह आणि अस्वल वाट बघत असणार, असा विचार करून तिला एक युक्ती सुचली. तिने आपल्या लेकीच्या शेतातून एक मोठा भोपळा मागवला आणि त्या भोपळ्यात हात आणि पाय जाण्या एवढी जागा केली आणि त्या भोपळ्यात बसून जंगलाच्या वाटेला निघाली. भोपळ्यात बसलेली असल्यामुळे सिंह आणि अस्वल तिला ओळखू शकले नाही अशा प्रकारे ती आपल्या घरी सुखरूप आली. अखेर तिच्या युक्तीनेच तिचे प्राण वाचवले आणि सिंह आणि अस्वल तिची वाटच बघत राहिले.


यावर अधिक वाचा :

नरेंद्र मोदींच्या वाराणसीत भीषण परिस्थिती, 'कुठे आहेत आमचे ...

नरेंद्र मोदींच्या वाराणसीत भीषण परिस्थिती, 'कुठे आहेत आमचे खासदार,' लोकांचा सवाल?
वाराणसी… हिंदूंसाठी पवित्र मानल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या शहरांपैकी एक. मात्र, वाराणसी आणि ...

परदेशी मदत कुठे गेली? राहुल गांधी यांचा सवाल

परदेशी मदत कुठे गेली? राहुल गांधी यांचा सवाल
देशातील कोरोना व्हायरस संकटाच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान ...

उल्हासनगर मध्ये धक्कादायक प्रकार, RTPCR स्वॅब स्टिकची ...

उल्हासनगर मध्ये धक्कादायक प्रकार, RTPCR स्वॅब स्टिकची घराघरात पॅकिंग
सुरक्षेची कोणतीही काळजी न घेता कोरोना टेस्टिंगसाठी वापरले जाणारे स्वॅब स्टिक घरात जमिनीवर ...

ब्लड ऑक्सीजन मॉनिटरसह स्मार्ट बँड्स, किंमत ऑक्सीमीटरपेक्षा ...

ब्लड ऑक्सीजन मॉनिटरसह स्मार्ट बँड्स, किंमत ऑक्सीमीटरपेक्षा कमी
देशात कोरोनाने थैमान मांडला आहे. दररोज लाखो लोक याने संक्रमित होत आहे. अशात आपल्या ...

IPL 2021: न्यूझीलंडचे चार क्रिकेटर्स परतणार नाही, कारण काय ...

IPL 2021: न्यूझीलंडचे चार क्रिकेटर्स परतणार नाही, कारण काय आहे ते जाणून घ्या
आयपीएल पुढे ढकलण्यात आल्यानंतरही न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनसह चार खेळाडू 10 ...

Black Fungus: डोळे-नाक-जबड्यावर काळी बुरशीचा हल्ला, सरकार ...

Black Fungus: डोळे-नाक-जबड्यावर काळी बुरशीचा हल्ला, सरकार ने सांगितले लक्षणं व बचावाचे उपाय
कोरोनामधील विनाश दरम्यान, म्यूकरमाइकोसिस म्हणजेच ब्लॅक फंगसचे वाढत असलेले प्रकरण ...

महाराष्ट्र गान

महाराष्ट्र गान
बहु असोत सुंदर संपन्न की महा । प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा ॥ धृ ॥ गगनभेदि ...

RBI ने फार्मासिस्टच्या पदासाठी अर्ज मागिवले

RBI ने फार्मासिस्टच्या पदासाठी अर्ज मागिवले
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) फार्मसिस्ट पदासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविले ...

जिथं नांदतो सदैव सुखानं परिवार...

जिथं नांदतो सदैव सुखानं परिवार...
जिथं नांदतो सदैव सुखानं परिवार, आनंदाला नसतो तिथं कधी पारावर,

कोमट पाण्यात लिंबू पिळून पिण्याचे 5 फायदे जाणून घ्या

कोमट पाण्यात लिंबू पिळून पिण्याचे 5 फायदे जाणून घ्या
दररोज सकाळी चहा, कॉफी, दूध किंवा ग्रीन टी पिणे आवडते, परंतु गरम लिंबू पाणी प्याल तर या ...