शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. गोडधोड
Written By वेबदुनिया|

तिळ्याच्या वड्या

साहित्य : 1 वाटी तिळाचे कूट, सव्वा वाटी साखर, वेलची पूड, तूप. 
 
कृती : सर्वप्रथम तिळ स्वच्छ करून हलके भाजून घ्यावे. भाजलेले तिळ मिक्सरमधून फिरवून घ्यावे. (कूट एकदम बारीक नको), ताटाला तूपाचा हात लावून तयार ठेवावे. साखरेचा एकतारी पाक करून त्या पाकात कूट घालून मिश्रण एकजीव करावे. त्यानंतर त्या मिश्रणाला ताटात घालून थापून घ्यावे. थोड थंड झाल्यावर त्याच्या वड्या कापाव्यात.