किचन साफ ठेवण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स

kitchen
Last Modified सोमवार, 24 फेब्रुवारी 2020 (17:32 IST)
घरातील सगळ्यात महत्त्वाची खोली म्हणजे किचन. घराचे किचन हे सर्व महिलांसाठी खास असते. काही महिला तर दिवसातील अधिकाधिक वेळ किचन साफ करण्यातच घालवतात. दिवसातील त्यांचा बराचसा वेळ किचनमध्येच जातो. किचनमध्येच त्या घरात राहणार्‍या लोकांचे स्वास्थ्य अवलंबून असते. किचन साफ ठेवणे गरजेचे असते कारण किचन साफ ठेवले नाही तर घरातील व्यक्ती आजारी पडू शकतात. मात्र सगळ्यात कठीण काम असते ते म्हणजे किचन साफ ठेवणे. कारण आपण सतत किचनमध्ये वावरत असल्याने ते तितकेच खराब होत असते.
स्वच्छ किचन कोणाला आवडत नाही मात्र प्रश्र्न असा आहे की किचन साफ कसे ठेवणार. तुम्हाला माहीत आहे का किचन साफ करण्याची पद्धत असते. अनेक महिला अशा असतात ज्यांना जेवण बनवताना किचन साफ ठेवण्याची सवय असते. मात्र काही महिला अशा असतात ज्या जेवण बनवताना सगळीकडे पसारा करून ठेवतात. आम्ही सांगत आहोत अशा काही टिप्स ज्या तुम्हाला किचनमध्ये साफसफाई
ठेवण्यास मदत करतील.

किचनच्या टाईल्स साफ करण्यासाठी भांडी घासण्यासाठी वापरल्या जाणार्‍या स्क्रबरला साबण लावून त्याने भिंती धुवा. टाईल्स स्वच्छ होतील. टाईल्स साफ करण्यासाठी तुम्ही ब्लीच, अमोनिया, बेकिंग सोडा तसेच व्हिनेगारचाही वापर करू शकता.
सिंक साफ करण्यासाठी आणि त्यात ग्रीस चिकटले असल्यास त्यात गरम पाणी टाका. यात तुम्ही व्हिनेगार आणि बेकिंग सोडा टाका. सिंक नव्यासारखे चमकू लागेल.

किचनमध्ये ठेवला जाणारा कचर्‍याचा डबा नेहमी स्वच्छ ठेवा. त्यातील पिशवी दररोज बदला.

फ्रीजची सफाई करण्यासाठी एका मगमध्ये गरम पाणी घ्या. त्यात थोडासा बेकिंग सोडा टाका. या मिश्रणाने फ्रीज साफ करा. यामुळे फ्रीज साफ होईलच तसेच त्यात किटाणू राहणार नाहीत.

किचनचे कॅबिनेट्‌स साफ करण्यासाठी व्हिनेगार आणि लिक्विड सोपचा वापर करा. व्हिनेगार आणि लिक्विड सोप एकत्रित करून घ्या. याने कॅबिनेट्‌स स्वच्छ करा. कॅबिनेट्‌स एकदम स्वच्छ दिसतील.


यावर अधिक वाचा :

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, ...

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, आरोग्य मंत्रालयाने जारी केले निर्देश
भारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत असून केंद्र सरकारने यासाठी तयारी केलेली ...

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी
देशभरात करोना व्हायरसमुळे काळजीचं वातरवारण पसरलं असताना महाराष्ट्रात या आजरामुळे पहिल्या ...

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात
राज्यात यवतमाळ येथे १ आणि नवी मुंबई येथे १ असे २ कोरोना रुग्ण आढळून आले. यामुळे राज्यातील ...

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय माहीत हवेत

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय  माहीत हवेत
– राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलल्या. – ग्रामीण ...

पुणे : दुकाने 3 दिवस बंद

पुणे : दुकाने 3 दिवस बंद
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातली दुकानं पुढील तीन दिवस बंद राहणार आहेत. कोरोनाचा फैलाव ...

आहारात सामील करा हे 5 पदार्थ, याने वाढेल आपली इम्युनिटी

आहारात सामील करा हे 5 पदार्थ, याने वाढेल आपली इम्युनिटी
टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन सी आणि फायबर जास्त प्रमाणात आढळतात. ह्याचा नियमित ...

थंडगार कैरीचं पन्हं, सोपी विधी जाणून घ्या

थंडगार कैरीचं पन्हं, सोपी विधी जाणून घ्या
साहित्य - 4 - 5 नग कैऱ्या, 4 वाटी साखर, वेलची पूड, मीठ. कृती - कैऱ्या साली ...

आरोग्य टिप्स : कोरड्या खोकल्यावर घरघुती उपाय करुन बघा

आरोग्य टिप्स : कोरड्या खोकल्यावर घरघुती उपाय करुन बघा
बदलत्या हंगामाच्या आपल्या शरीरांवर प्रभाव पडत असतो. सर्दी पडसे तर हमखास होतोच. विशेषतः ...

21 Days lock down: पार्टनरसोबत अशा प्रकारे घालावा वेळ

21 Days lock down: पार्टनरसोबत अशा प्रकारे घालावा वेळ
हा काळ असा आहे की आपल्याला आपल्या कुटुंबासह वेळ घालवण्यासाठी हवा तेवढा वेळ मिळत असेल. ...

आरोग्यासाठी फायदेशीर मखाणे, हे खाल्ल्यास 6 रोग राहतील

आरोग्यासाठी फायदेशीर मखाणे, हे खाल्ल्यास 6 रोग राहतील लांब..
माखाणे सारख्या सुक्या मेव्याचे गुणधर्म आणि त्याचे फायदे ऐकल्यावर आपण दररोजच्या आहारात ...