बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. ग्लासातल्या ग्लासात
Written By
Last Modified: रविवार, 1 मे 2022 (15:33 IST)

KitchenTips :या टिप्स अवलंबवून चुटकीशीर ताक तयार करा

buttermilk benefits
उन्हाळा आला की आपल्या सर्वांची पाण्याची गरज वाढते. उष्णतेच्या दिवसात आपल्याला वारंवार तहान लागते आणि प्रत्येक वेळी आपण आपली तहान शमवण्यासाठी पाणी पीत नाही. त्यापेक्षा अनेक प्रकारच्या पेयांचा आहारात समावेश करा. स्मूदीपासून ते लिंबूपाण्यापर्यंत अनेक पेयांमुळे शरीर आणि मनाला समाधान मिळते. यापैकी एक पेय म्हणजे ताक. दही आणि पाण्याच्या साहाय्याने तयार केलेले हे पेय चवीला खूप चविष्ट असते आणि त्याच बरोबर शरीराला आतून शीतलता देते. तहान आणि भूक शमते.असं असलं तरी उन्हाळ्यात दही खाण्याचा सल्ला सर्वांना दिला जातो, मग दह्यापासून ताक बनवून आपण आनंद घ्या. आज आम्ही चटकन ताक बनवण्याच्या सोप्या पद्धतीबद्दल सांगत आहोत चला तर मग साहित्य आणि कृती जाणून घेऊ या.
 
साहित्य-
1कप दही,
1 कप पाणी
1 टीस्पून जिरे पूड 
1/2 टीस्पून चाट मसाला 
1 टीस्पून चिरलेली कोथिंबीर 
4-5 ताजी पुदिन्याची पाने 
चवीनुसार काळे मीठ
 
कृती-
 
ताक बनवण्यासाठी तुम्हाला जास्त वेळ किंवा मेहनत करावी लागत नाही. यासाठी तुम्ही एक भांडे घ्या, त्यात दही आणि पाणी घाला. लक्षात ठेवा की पाणी खूप थंड असावे, जेणेकरून तुमचे ताकही थंड-गार होते आणि ते पिण्याची चव अनेक पटींनी वाढते. आता ते घुसळण्यासाठी  तुम्ही हँड ब्लेंडर किंवा पारंपारिक रवी' वापरू शकता. या मुळे चांगले ताक मिळेल.
 
आता त्यात मसाले मिसळा. दही आणि पाण्याच्या मिश्रणात जिरेपूड, चाट मसाला आणि काळे मीठ घाला. ते पुन्हा काही वेळा मिसळा जेणेकरून सर्व मसाले चांगल्या प्रकारे  मिसळतील. तुम्ही तुमच्या आवडीनुसार दही आणि पाण्याचे प्रमाण वाढवू किंवा कमी करू शकता. जर तुम्हाला भरपूर थंड ताक प्यायला आवडत असेल तर तुम्ही त्यात काही बर्फाचे तुकडे देखील टाकू शकता.तुमचे चविष्ट ताक तयार आहे. शेवटी कोथिंबीर, पुदिन्याच्या पानांनी सजवा आणि थंडगार सर्व्ह करा.