शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By

कर्जतजवळ मालगाडीचे 16 डबे घसरले, वाहतूक विस्कळीत

मुंबई-पुणे रेल्वेमार्गावरील कर्जत-लोणावळा दरम्यानच्या घाटात मालगाडीचे 16 डबे रुळावरुन घसरले आहेत. या घटनेमुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. मुंबई-पुणे रेल्वे सेवा विस्कळीत झाली असून इंटरसिटी, डेक्कन एक्स्प्रेससह काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर, काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. 
 
पहाटे साडे चार वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातामुळे मुंबईहून पुण्याला जाणाऱया मुंबई-पुणे इंटरसिटी एक्स्प्रेस, मुंबई-पुणे-डेक्कन एक्स्प्रेस, मुंबई-पुणे इंद्रायणी एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच पनवेल-पुणे पॅसेंजर, पुणे-सीएसएमटी डेक्कन एक्स्प्रेस, पुणे-भुसावळ एक्स्प्रेस, पुणे-सीएसएमटी प्रगती एक्स्प्रेस या पुण्याहून सुटणाऱया टेन्सही रद्द करण्यात आल्या आहेत. 
 
तसेच भुसावळ-पुणे एक्स्प्रेस नाशिक रोड रेल्वे स्थानकात थांबवण्यात आली आहे. तसेच हुजूर साहिब एक्स्प्रेस पनवेलला न जाता पुण्यात येथे थांबवण्यात आली आहे. हमसफर एक्स्प्रेस देखील पनवेलमध्ये थांबल्याची माहिती मिळत आहे. मुंबईहून पुणे मार्गे जाणार्‍या इतर पल्ल्याच्या गाड्या इगतपुरीमार्गे वळवण्यात आल्या आहेत. लवकरच सुधारीत वेळापत्रक जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली आहे.