शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Modified: बुधवार, 10 नोव्हेंबर 2021 (16:52 IST)

WhatsApp Viral: मोदी सरकार देतंय लॅपटॉप मोफत! जाणून घ्या काय आहे या व्हायरल मेसेजचे सत्य?

WhatsApp Viral: काही वेळा इन्स्टंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपवर खोटी माहिती (Whatsapp Viral Message)ही व्हायरल होते, ज्यामुळे लोकांची दिशाभूल होते. मात्र, अशा खोट्या बातम्यांना आळा घालण्यासाठी व्हॉट्सअॅप सर्वतोपरी प्रयत्न करत आहे (Whatsapp India). दरम्यान, व्हॉट्सअॅपवर एक वायरल मेसेज पुन्हा चर्चेत आले आहे. (Whatsapp Features)या मेसेजमध्ये 'पंतप्रधान मोफत लॅपटॉप वितरण योजनेंतर्गत लोकांना लॅपटॉपचे मोफत (Free Laptop Scheme) वाटप केले जाईल', असे सांगण्यात येत आहे. त्याच वेळी, आता पीआयबी फॅक्ट चेकने या मेसेजची सत्यता सांगितली आहे जो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
 
पीआयबी फॅक्ट चेकच्या ट्विटर हँडलवर दिलेल्या माहितीनुसार, 'व्हॉट्सअॅपवर सध्या एक मेसेज चांगलाच व्हायरल होत आहे. ज्यामध्ये मोदी सरकारकडून पूर्णपणे मोफत लॅपटॉप वितरित केले जात असल्याचे लिहिले आहे. लवकर बुक करा. यासोबतच मेसेजमध्ये एक लिंक देण्यात आली असून या लिंकवर क्लिक करून तुम्ही लॅपटॉपसाठी नोंदणी करू शकता, असे सांगण्यात आले आहे.
 
पीआयबी फॅक्ट चेकने या मेसेजची सत्यता सांगितली असून 'हा मेसेज पूर्णपणे खोटा आहे. पंतप्रधान मोफत लॅपटॉप वितरण योजना सरकारकडून चालवली जात नाही. यासोबतच लोकांना अशा फेक मेसेजपासून सावध राहण्यास सांगण्यात आले आहे. पीआयबी फॅक्ट चेक म्हणतो की अशा मेसेजमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करू नका किंवा हे मेसेज फॉरवर्ड करू नका. अशा लिंक्स आणि वेबसाइट्सवर तुमची वैयक्तिक माहिती शेअर करू नका.