मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: गुरूवार, 16 डिसेंबर 2021 (16:03 IST)

राज ठाकरेंकडून बाळाचे बारसे, यश नाव दिलं बाळाला

मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. या दरम्यान अनेकांना त्यांची भेट घेण्याची इच्छा होते पण एक दंपती वेगळीच मागणी घेऊन त्यांच्याकडे आले. आधीतर राज ठाकरे यांनी याला नकार दिला पण कार्यकर्ता हट्टाला पेटल्यावर राज यांनी त्यांची मागणी पुरवली.
 
आपल्या बाळाचे बारसे राज ठाकरे यांनी करावे ही एका सर्वसामान्य कार्यकर्त्याची इच्छा होती. त्यासाठी गुरुवारी सकाळपासून हे दाम्पत्य 4 महिन्यांच्या बाळाला घेऊन ठाकरे यांची केसरीवाड्यात वाट पाहात होते. जसेच ठाकरे बैठक संपवून निघाले हे दाम्पत्य त्यांच्यासमोर गेले आणि आपली इच्छा बोलून दाखविली. आधीतर ठाकरेंनी इतकी मोठी जबाबदारी नको म्हणत नकार देण्याचा प्रयत्न केला पण शेवटी कार्यकर्त्यापुढे त्यांना होकर द्यावा लागला आणि अखेर राज ठाकरे यांनी बाळाचे नामकरण करत त्याला "यश" असे नाव दिले.
 
परभणीचे पदाधिकारी निशांत कमळू आणि त्यांची पत्नी विशाखा यांच्या घरी चार महिन्यांपुर्वीच एक गोंडस बाळ आले. आपल्या या बाळाचे नाव राज ठाकरे यांच्याकडूनच ठेवायचे, असे दोघांनी ठरविले होते. या दाम्पत्याने ठाकरे यांचा पुणे दौऱ्यावर असताना त्यांची भेट घेतली आणि आपली इच्छा सांगितली. दरम्यान, राज ठाकरे यांनी आपल्या मुलाचे नाव ठेवल्याबद्दल निशांत कमळू यांनी आनंद व्यक्त केला आसून मुलाचे भविष्य उज्वल होईल, अशी आशा व्यक्त केली.