पुदिन्याचे 10 आरोग्यदायी फायदे जाणून घ्या

Last Modified रविवार, 16 मे 2021 (16:44 IST)
पुदिन्याचा वापर चव आणि औषधी गुणांसाठी कधीही केला जाऊ शकतो. परंतु आपल्या थंड प्रकृती आणि गुणधर्मामुळे याचा वापर उन्हाळ्यात जास्त करतात.यांचे अनेक फायदे मिळतात. चला याचे 10 आरोग्यदायी फायदे जाणून घेऊ या.

1पोटाची उष्णता कमी करण्यासाठी पुदीना वापरणे खूप फायदेशीर आहे. या व्यतिरिक्त पोटाशी संबंधित इतर समस्यांपासून मुक्त होण्यासाठी देखील हे फायदेशीर आहे. या मुळे कोणतेही दुष्परिणामही होत नाही.

2 दिवसभर बाहेर लोक राहतात त्यांना तळपायात जळजळ होण्याची तक्रार असते.अशा परिस्थितीत फ्रीजमध्ये ठेवलेला पुदीना वाटून त्वरित आराम मिळण्यासाठी तळपायावर लावा. यामुळे पायांची उष्णता देखील कमी होईल.
3 कोरडे किंवा ओला पुदिना
ताक, दही, कच्च्या कैरी च्या पन्हात
मिसळून, प्यायल्याने पोटातील जळजळ पासून आराम मिळेल
आणि थंडावा मिळेल. तसेच गरम वार आणि उष्माघातापासून संरक्षण मिळेल.

4 आपल्याला टॉन्सिल्स आणि यामध्ये येणाऱ्या सूज ची तक्रार असल्यास पुदिनाच्या रसात साध पाणी घालून या पाण्याने गुळणे करा. हे फायदेकारी ठरेल.

5 उन्हाळ्यात पुदिना चटणीचा दर रोज वापर केल्याने आरोग्याशी संबंधित बरेच फायदे मिळतात. पुदिना,काळी मिरपूड, हिंग,सेंधव मीठ,मनुके, जिरे, खजूर आणि खारीक मिसळून चटणी बनवून घ्या. ही चटणी पोटातील अनेक आजारांपासून बचाव करते आणि खायलाही चविष्ट असते. भूक नसल्यावर किंवा खाण्यात अरुची असल्यास ही चटणी खाल्ल्यावर भूक वाढवते.

6 पुदीना आणि आल्याचा रस थोडासा मध मिसळून चाटण घेतल्याने खोकला बरा होतो.

7 पुदिन्याच्या पानांचा लेप लावल्याने अनेक प्रकारचे त्वचेचे आजार दूर होतात. जखम भरण्यासाठी देखील हे उत्तम उपचार आहे.

8 पुदीना नियमितपणे
सेवन केल्याने कावीळ यासारख्या आजारांपासून आपले रक्षण होते. त्याचबरोबर, पुदीनाचा वापर मूत्रमार्गाच्या आजारासाठी देखील खूप उपयुक्त आहे. पुदीनाची पाने
वाटून पाणी आणि लिंबाचा रसासह प्यायल्याने शरीरातील आंतरिक स्वच्छता होते.

9 वारंवार हिचकीचा त्रास होत असेल तर पुदीनामध्ये साखर घालून हळू हळू चावा. काहीच वेळात हीचकी पासून मुक्तता मिळेल.

10 या व्यतिरिक्त उन्हाळ्यात पुदीनाची पेस्ट चेहर्‍यावर लावल्याने
त्वचेची
उष्णता कमी होईल आणि आपल्याला फ्रेश वाटेल.


यावर अधिक वाचा :

"जपा वनस्पती, करा त्याचा उपयोग, निरामय जीवनासाठी"

विविध वनस्पतीचा मौल्यवान खजीना, अमूल्य आहे, जपा वनस्पती ना,

धनकवडीत राहत्या घरात रक्ताच्या थारोळ्यात महिलेचा मृतदेह ...

धनकवडीत राहत्या घरात रक्ताच्या थारोळ्यात महिलेचा मृतदेह सापडला
पुण्यातील धनकवडी परिसरातील एका घरामध्ये रक्ताच्या थारोळ्यात एका महिलेचा मृतदेह सापडला. आज ...

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सतर्कतेमुळे ‘ती’ बचावली

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सतर्कतेमुळे ‘ती’ बचावली
संगमनेर तालुक्यातील कौठे कमळेश्वर गावात होणारा अल्पवयीन मुलीचा बालविवाह रोखण्यात ...

ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांसाठी उद्योगांना विशेष प्रोत्साहन; ...

ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांसाठी उद्योगांना विशेष प्रोत्साहन; शासन निर्णय जारी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याची ऑक्सिजनची गरज पूर्ण करण्यासाठी शासनाने ‘मिशन ऑक्सिजन ...

‘लसीच्या तुटवड्याला केंद्र सरकारच जबाबदार’; सीरम ...

‘लसीच्या तुटवड्याला केंद्र सरकारच जबाबदार’; सीरम इन्स्टिट्यूटचा धक्कादायक आरोप
गेल्या अनेक दिवसांपासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशभरात थैमान घातलं आहे. कोरोनाच्या ...

अनलॉक ला सहज घेऊ नका ,या 10 गोष्टी लक्षात ठेवा

अनलॉक ला सहज घेऊ नका ,या 10 गोष्टी लक्षात ठेवा
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आता हळूहळू कमी होत आहे. देशातही अनलॉक करण्याची प्रक्रिया सुरू ...

World Yoga Day 2021:योगासन म्हणजे काय, त्याचे किती प्रकार ...

World Yoga Day 2021:योगासन म्हणजे काय, त्याचे किती प्रकार आहे जाणून घ्या
21 जून 2021 रोजी जागतिक योग दिन साजरा केला जाणार .योगातील आसन काय आहेत, आसन कशाला म्हटले ...

चविष्ट साबुदाणा फ्रुट कस्टर्ड

चविष्ट साबुदाणा फ्रुट कस्टर्ड
जर आपल्याला गोड खाणं आवडत तर या वेळी साबुदाण्याचे फ्रुट कस्टर्ड बनवा. हे खाण्यात चविष्ट ...

कातर वेळचा गार वारा

कातर वेळचा गार वारा
कातर वेळचा गार वारा, तुझी स्मृती घेऊन भेटतो, मिट्ट काळोख येता गारवा

हललें जरासें चांदणे

हललें जरासें चांदणे
हललें जरासें चांदणें भरल्या दिशांच्या पापण्या, होतील वर्षे मोकळी हरवून त्या साऱ्या ...