उपवासाचे चविष्ट बटाटा पॅटीस

Last Modified शनिवार, 24 ऑक्टोबर 2020 (11:24 IST)
साहित्य -
5 चमचे किसलेलं नारळ, 3 चमचे शेंगदाण्याचं कूट, 3 चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर, 1 चमचा आलं-हिरवी मिरची पेस्ट, 1 चमचा लिंबाचा रस, मीठ चवीप्रमाणे, बेदाणे, काजू, 3 -4 उकडलेले बटाटे, 3 चमचे एरोरूटच पीठ, तेल किंवा तूप तळण्यासाठी.
सारणाची कृती -
सर्वप्रथम एका भांड्यात किसलेलं नारळ घाला त्यामध्ये शेंगदाण्याच कूट घाला. या मध्ये आलं-मिरची पेस्ट, काजू बेदाणे (किशमिश), कोथिंबीर, आणि लिंबाचा रस आणि सैंधव मीठ घालून मिसळून घ्या.

पॅटीस बनविण्याची कृती -
सर्वप्रथम एका भांड्यात उकडलेले बटाटे चांगल्या प्रकारे कुस्करून घ्या. या मध्ये एरोरूटच पीठ घाला. सैंधव मीठ घाला. चांगल्या प्रकारे मिसळून घ्या आणि घट्ट गोळा मळून घ्या. आता आपल्या हातावर बटाट्याचे मिश्रण घ्या आणि त्याला हातानेच पुरीचा आकार द्या. त्यामध्ये नारळाचे सारण भरा आणि सर्व बाजूने त्याला एकत्र करून गोलाकार द्या. अश्या प्रकारे सर्व गोळे तयार करून त्या बॉलच्या आकाराचे गोळे एरोरूटच्या पिठामध्ये रोळून घ्या.
आता कढईत शेंगदाण्याचं तेल किंवा तूप तापवायला ठेवा. तेल गरम झाल्यावर हे बटाट्याचे गोळे त्यात हळुवार सोडा. तांबूस सोनेरी रंग येई पर्यंत मध्यम आचेवर तळून घ्या. आता या तळलेल्या पॅटिसांना टिशू पेपर वर काढून ठेवा. जेणे करून ते जास्तीचे तेल शोषून घेईल.

चविष्ट गरम उपवासाचे बटाटा पॅटीस खाण्यासाठी तयार. हे पॅटीस हिरव्या चटणी आणि दह्यासह सर्व्ह करावे.


यावर अधिक वाचा :

पंढरपुरात विठू-रखुमाईची शासकीय महापूजा पहाटे उत्साहात

पंढरपुरात विठू-रखुमाईची शासकीय महापूजा पहाटे उत्साहात संपन्न
कार्तिकी एकादशीला पंढरपुरात श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात विठू-रखुमाईची शासकीय महापूजा ...

शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेला हिरवा कंदिल, राज्य सरकार वादात ...

शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेला हिरवा कंदिल, राज्य सरकार वादात सापडण्याची चिन्हे
मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या हंगामी स्थगितीनंतर ठप्प झालेली २०२०-२१ या ...

दिग्गज फुटबॉलर डिएगो मॅराडोना यांचे वयाच्या 60 व्या वर्षी ...

दिग्गज फुटबॉलर डिएगो मॅराडोना यांचे वयाच्या 60 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले
अर्जेंटिनाचा महान फुटबॉलर आणि प्रशिक्षक डिएगो मॅराडोना यांचे वयाच्या 60 व्या वर्षी निधन ...

चमोलीच्या नीती खोर्‍यात पहिल्यांदा वाजतील मोबाइल, JIOने ...

चमोलीच्या नीती खोर्‍यात पहिल्यांदा वाजतील मोबाइल, JIOने प्रथमच दोन 4 जी टॉवर्स सुरू केले
उत्तराखंडच्या चमोलीतील भारत-तिबेट सीमेला लागणारी नीती खोर्‍यात रिलायन्स जिओचे दोन 4 जी ...

आई हेच आपले खरे दैवत

आई हेच आपले खरे दैवत
प्रत्येकाच्या आयुष्यात महत्त्वाची भूमिका कोणी बजावत तर ती आपली आई असते. खरं तर आई हा शब्द ...

महत्त्व नखांच्या स्वच्छतेचं

महत्त्व नखांच्या स्वच्छतेचं
शरीराच्या स्वच्छतेकडे प्रत्येकजण कमी अधिक प्रमाणात काहोईना लक्ष देत असतो. पण नखांच्या ...

हनुमानाकडून Management शिका, नेहमी यश हाती लागेल

हनुमानाकडून Management शिका, नेहमी यश हाती लागेल
अंजनीपुत्र हनुमान एक कुशल व्यवस्थापक होते. मनावर, कृतीवर आणि वाणीवर संतुलन कसे ठेवायचं हे ...

मेथीची भाजी बऱ्याच काळ ताजी ठेवण्यासाठी गजब टिप्स

मेथीची भाजी बऱ्याच काळ ताजी ठेवण्यासाठी गजब टिप्स
हिवाळ्याच्या हंगामात बऱ्याच भाज्या बाजारपेठेत दिसू लागतात. या मध्ये हिरव्या पाले ...

Immune System मजबूत करतं तुळशीचा चहा

Immune System मजबूत करतं तुळशीचा चहा
सर्वप्रथम 2 कप पाणी एका पातेलीत घालून उकळण्यासाठी ठेवा. पाणी उकळल्यावर पातळी गॅस वरून ...

Canara Bank SO Recruitment 2020 विशेषज्ञ अधिकारी पदांसाठी ...

Canara Bank SO Recruitment 2020 विशेषज्ञ अधिकारी पदांसाठी भरती सुरू
कॅनरा बँकेने विशेषज्ञ अधिकाऱ्यांच्या पदासाठी रिक्त जागा काढली आहेत. पदवीधरांना बँकेत ...