सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. गणेशोत्सव
  3. गणेश महिमा
Written By
Last Updated : शनिवार, 29 ऑगस्ट 2020 (09:22 IST)

कोण आहेत श्री गणेशाच्या बायका : जाणून घेऊ या रिद्धी आणि सिद्धी चे चमत्कार....

भाद्रपदेच्या शुक्ल चतुर्थीच्या दिवशी भगवान श्री गणेशाचे जन्म झाले असे. म्हणूनच या दिवशी गणपतीची स्थापना करून गणेशोत्सव साजरे केले जाते. चला जाणून घेऊ या प्रथम आराध्य आणि पूज्य अश्या या गणपतींच्या बायकांबद्दल थोडक्यात माहिती.
 
गणेशाच्या बायका : गणेशाच्या रिद्धी आणि सिद्धी नावाच्या दोन बायका आहेत, ज्या प्रजापती विश्वकर्मा यांच्या कन्या आहेत. सिद्धी पासून क्षेम, आणि रिद्धी पासून 'लाभ ' नावाचे 2 मुलं झाले. लोक परंपरेत यांना 'शुभ' आणि 'लाभ' असे ही म्हणतात. संतोषी मातेला गणेशाची मुलगी म्हणून म्हटले जाते.
 
गणेशाचे नातवंड आमोद-प्रमोद आहे. शास्त्रांमध्ये तुष्टी आणि पुष्टी गणपतीच्या सुना असे म्हटले जाते.
 
गणेशाचे लग्न : पौराणिक कथांमध्ये ज्या प्रकारे शिव-पार्वती लग्न, विष्णू-लक्ष्मी लग्न, आणि रुक्मिणी-कृष्ण लग्न प्रख्यात आणि लोकप्रिय आहेत त्याच प्रकारे गणेशाच्या लग्नाची चर्चा देखील सर्व पुराणात मनोरंजकपणे आढळते.
 
असे म्हणतात की तुळशीच्या लग्न प्रस्तावाला नाकारून तुळशीच्या शाप मिळाल्यामुळे गणेशाला रिद्धी आणि सिद्धीशी लग्न करावे लागले. गणेशाने देखील तुळशीला शाप दिले की तिचे लग्न एकाद्या असुराशी होणार. तेव्हा तुळशीने वृंदा म्हणून जन्म घेतले आणि तिचे लग्न जलंधर नावाच्या असुराशी झाले.
 
असे ही म्हटले जाते की ब्रह्माजींनी रिद्धी आणि सिद्धीला शिकवणी साठी गणेशाकडे पाठविले होते. जेव्हा जेव्हा गणेशाकडे लग्नाचा प्रस्ताव आला, तेव्हा रिद्धी-सिद्धी दोघी जणी गणेशाचे आणि त्यांचा मूषकाचे मन विचलित करीत असे. कारण दोघींना गणेशाशी लग्न करावयाचे असे. एके दिवशी गणेश विचार करू लागले की सगळ्यांचे लग्न तर झाले आहे माझ्या लग्नातच विघ्न का बरं येत आहेत? मग त्यांना रिद्धी-सिद्धीच्या कृतीची माहिती कळतातच त्यांना शाप देऊ लागले तेव्हाच ब्रह्मा तिथे आले आणि त्यांनी गणेशाला असे करण्यास रोखले आणि रिद्धी-सिद्धीशी लग्न करण्याचा सल्ला दिला. तेव्हा गणेश तयार झाले आणि मग गणेशाचे लग्न थाटामाटात झाले.
 
रिद्धी आणि सिद्धी : श्री गणेशाच्या बरोबर त्यांचा दोघी बायका रिद्धी-सिद्धी आणि त्यांचे मुलं शुभ-लाभ यांची पूजा केली जाते. रिद्धी(बुद्धी-विवेकाची)देवी आणि सिद्धी (यशाची देवी) असे. स्वस्तिकाच्या दोन्ही वेगवेगळा रेषा रिद्धी-सिद्धीला दर्शवितात. रिद्धी-सिद्धीच्या खालील मंत्राने पूजा केल्यास दारिद्र्य आणि अशांतता दूर होते. घरात सुख, समृद्धी आणि शांती वास्तव्यास असते.
 
* गणेश मंत्र- ॐ गं गाणपत्ये नम:
* ऋद्धी मंत्र- ॐ हेमवर्णायै ऋद्धये नम:
* सिद्धी मंत्र- ॐ सर्वज्ञानभूषितायै नम:
* शुभ मंत्र- ॐ पूर्णाय पूर्णमदाय शुभाय नम:
* लाभ मंत्र- ॐ सौभाग्य प्रदाय धन-धान्ययुक्ताय लाभाय नम:
सिद्धीचा अर्थ : सिद्धी शब्दाचा अर्थ आहे यश. सिद्धी म्हणजे एखाद्या कामात निपुण असणे. सिद्धी या शब्दाचा अर्थ चमत्कार किंवा गूढ असे समजले जाते, पण योगानुसार सिद्धीचा अर्थ इंद्रियांची पुष्टीकरण आणि सामान्यता. म्हणजे पाहणे, ऐकणे आणि समजून घेण्याची क्षमता विकसित करणे. सिद्धी दोन प्रकारच्या असतात एक परा आणि दुसरी अपरा. विषयाशी निगडित सर्व प्रकारची उत्तम, मध्यम आणि अधम सिद्धींना 'अपरा' सिद्धी म्हटले जाते. ही मुमुक्षांसाठी असते. या व्यतिरिक्त ज्या स्वस्वरूपाच्या अनुभवाच्या उपयुक्त सिद्धी आहेत त्या योगिराजासाठी वापरण्यायोग्य परा सिद्धी आहेत.